बंगळुरु । कर्नाटकातील शेतकऱ्यांना सरकारने खूप मोठा दिलासा दिला असून ३४ हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी आपलं पहिलं बजेट विधानसभेत मांडण्यास सुरुवात केली असून यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. यासोबतच कुमारस्वामी यांनी निवडणुकीआधी दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आपलं आश्वासन पुर्ण केलं आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.
I have decided to limit the loan amount to Rs 2 lakhs. Due to this crop loan wiaver scheme, farmers will get the benefit of Rs 34,000 crore: HD Kumaraswamy while presenting the budget in Vidhana Soudha pic.twitter.com/CKeVaXv9Yx
— ANI (@ANI) July 5, 2018
कुमारस्वामी यांनी जाहीर केल्यानुसार, शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचं कर्ज माफ केलं जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं दोन लाखांचं कर्ज माफ होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत घेण्यात आलेल्या कर्जावरही दिलासा देण्यात आला आहे. बजेट मांडण्याआधी कुमारस्वामी यांनी हा आपला पहिलाच अनुभव असून, एक आव्हान म्हणून याकडे पाहत असल्याचे म्हटले होते.