कर्नाटकातील बाजी पलटल्याने पिंपरीत काँग्रेसचा जल्लोष

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाटले लाडू

पिंपरी : कर्नाटकात सत्तास्थापनेपासून भाजपला बाजुला ठेवत बाजी पलटविण्यास काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्याबद्दल पिंपरीमध्ये शहर काँग्रेसच्यावतीने जल्लोष करण्यात आला. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमत सिध्द करण्याआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एका दिवसात पायउतार व्हावे लागले. भाजपची ही संपूर्ण बाजी पलटविण्यात आल्याने काँग्रेससाठी हे मोठे यश मानले जात आहे. आता कर्नाटकमध्ये काँग्रेस व जेडीएसचे एकत्रित सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फटाक्यांची आतषबाजी
भाजपची आलेले अपयशाबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी आणि नागरिकांना काँग्रेसकडून लाडू वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अल्पसंख्याक सेल प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महिला प्रदेश सचिव बिंदू तिवारी, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैसवाल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.