बंगळूर- कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून जोरदार हालचाली सुरु आहे. काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये भाजपा नेत्यांसोबत आहेत असा दावा जलसिंचन मंत्री डी.के.शिवकुमार यांनी केला. राज्यात घोडेबाजार सुरु आहे. आमचे तीन आमदार मुंबईत हॉटेलमध्ये असून भाजपा आमदार आणि नेते त्यांच्यासोबत आहेत. कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होण्यामागे शिवकुमार यांची भूमिका महत्त्वाची मानले जाते.
आमदारांना प्रलोभने दाखवली जात आहेत त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे असे शिवकुमार म्हणाले. २००८ साली कर्नाटकात तत्कालिन येडियुरप्पा सरकार टिकवून ठेवण्यासाठी त्यावेळी भाजपाने विरोधी पक्षाच्या काही आमदारांना प्रलोभन, आमिषे दाखवली होती.