कर्नाटकात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष

0

इंडिया टुडेचा सर्व्हे, पण सत्तेच्या चाव्या जेडीएसकडे
कर्नाटक विधानसभा निवडणूक

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान तर 15 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. तत्पुर्वी इंडिया टुडेने केलेल्या सर्व्हेत कर्नाटकामध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील पण सत्तेच्या चाव्या जनता दल सेक्युलर (जेडीएस) या पक्षाकडे असतील असाही अंदाज यामध्ये वर्तविण्यात आला आहे.

बहुमताचा आकडा 113
इंडिया टुडेच्या सर्व्हेनुसार भाजपला फक्त 78 ते 86 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 90 ते 101 चा पल्ला गाठता येईल. तर जनता दल सेक्युलरला 34 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. 224 जागा असणार्‍या कर्नाटक विधानसभेचा बहुमताचा आकडा 113 असल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी चांगलीच चढाओढ होणार आहे. त्यामुळे कर्नाटकची निवडणूक अपेक्षेप्रमाणे उत्सुकतेची होणार आहे. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 122 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. भाजपा आणि जेडीएसला 40-40 जागांवर समाधान मानाव लागले होते. तर 9 जागांवर अपक्ष विजयी झाले होते.

कर्नाटक विधानसभा
इंडिया टुडेचा निवडणूक अंदाज
पक्ष           जागा
भाजप     78 ते 86
काँग्रेस    90 ते 101
जेडीएस   34 ते 43