कर्नाटक सत्तासंघर्ष; आमदार थांबून असलेल्या हॉटेलबाहेर संचारबंदी !

0

बंगळूर: कर्नाटकातील काही आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार अल्पमतात आले आहे. राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचे पडसाद मुंबईत उमटत आहे. राजीनामे देऊन आमदार मुंबईत एका अलिशान हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. मुंबईतील पवईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये आमदार थांबले आहे. या आमदारांचे मनवळण्यासाठी काँग्रेस नेते डी. शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. तर मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, बंडखोर आमदारांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच शिवकुमार यांना भेटण्यास रोखावे, असे पत्र आमदारांनी मुंबई पोलिसांना दिले आहे. त्यामुळे रेनेसाँ हॉटेलमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.