कर्नाटक सरकारला हात लावल्यास अमित शहांना होणार गंभीर आजार; कॉंग्रेस खासदार

0

नवी दिल्ली- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लू झाला आहे. यावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभा सदस्य बी.के.हरिप्रसाद यांनी अमित शहा यांची खिल्ली उडविली आहे. कर्नाटक सरकारला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास अमित शहांना गंभीर आजार जडेल असे शाप देत त्यांनी त्यांच्या आजारपणाबाबत खिल्ली उडविली आहे.

बी.के.हरिप्रसाद हे राज्यसभा उपसभापती पदासासाठी कॉग्रेसकडून उमेदवार होते. एनडीएचे हरिवंश यांनी त्यांचा पराभव केला होता. कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार पडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. तशा हालचाली देखील केल्या जात आहे. भाजपकडून कॉंग्रेस आमदारांना मंत्रीपद तसेच पैशाचे आमिष दाखविले जात आहे.