कर्मचारी अन्यायाविरोधात सीआरएमएसतर्फे निदर्शने

0

भुसावळ- कर्मचार्‍यांवरील अन्यायाविरोधात सीआरएमएसतर्फे झोनल वर्कशाप सचिव पी.एन.नारखेडे यांच्या कार्यालयात मंगळवारी निदर्शने करण्यात आली. पीओएच वर्कशापच्या कार्मिक विभागावर सर्व कर्मचार्‍यांना सोबत घेऊन हल्लाबोल आंदोलन करून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. कनिष्ठ कर्मचार्‍यांना प्रमोशन न देता कर्मचार्‍यांवर अन्याय करणे, कर्मचार्‍यांसोबत अन्यायकारक वागणे, कर्मचार्‍यांचे लिव्ह रेकॉर्ड बरोबर मेन्टेन ना करणे आदी समस्यांबाबत निदर्शने करण्यात आली. या विरोध प्रदर्शनात सचिव डी.यु.इंगले, कार्याध्यक्ष किशोर कोलते, उपाध्यक्ष मेघराज तल्लारे, ईश्वर बविस्कर, विकास सोनवणे, हरीचंद सरोदे, पी.के. जोशी, स्वप्निल पाटिल, डावसन, दीपक तायडे, भूषण सोनार, संदेश इंगले, शुभम तराले, ललित चौधरी, गिरीश फालक, चंद्रकांत चौधरी आदींची उपस्थिती होती.