कर्मचारी युनियन निवडणुकीत 7 उमेदवार बिनविरोध

0

जळगाव : जिल्ह्यातील सहकारी बँकांची व जिल्हा मध्यवर्ती सह.बँक कर्मचारी स्टाफ युनियनची सन 2017-22 या कालावधीसाठी होऊ घातली होती. प्रत्येक पदाकरिता फक्त एकच अर्ज राहिल्याने सहकार पॅनलचे सर्व सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यात अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष 1 सुनित शितोळे, उपाध्यक्ष 2 मुकेश शिंदे, जनरल सेक्रेटरी सुनिल पवार, जॉईंट सेक्रेटरी 1 सुनिल पाटील, जॉईंट सेक्रेटरी 2 संतोष इंगळे, खजिनदार राहुल पाटील यांचा समावेश आहे.

निवड झाल्याचे सर्वत्र अभिनंदन
निवडणुकीसाठी बँकेचे ज्येष्ठ संचालक एकनाथराव खडसे, चेअरमन अ‍ॅड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष आ.किशोर पाटील व सर्व सन्माननीय संचालक मंडळ, बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, कर्मचारी युनियनचे माजी अध्यक्ष हेमंतकुमार साळुंखे, जॉ.सेक्रेटरी अनिल चौधरी, प्रदीप भिरुड व बँकेचे सर्व अधिकारी, पदाधिकार्‍यांनी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीराम पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतिश पाटील यांनी कामकाज पाहिले.