पिंपरी-चिंचवड : कंपनीतील कामगारांचा पगार करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या 2 लाख 16 हजार रूपयांवर दोन कामगारांनी डल्ला मारला. हा प्रकार एमआयडीसीतील अलका टेक्नोलॉजी कंपनीत शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकरा वाजता उघडकीस आला. याप्रकरणी सदाशिव कोल्हे (वय 37, रा. चिंचवडगांव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार अनिल वालचंद्र यादव, संतोष यादव (दोघे ही रा. निरोर, बिहार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसीमध्ये एस. ब्लॉक डब्ल्यु 16 मध्ये अलका टेक्नोलॉजी ही कंपनी आहे. आरोपींनी गुरूवारी सव्वा चार ते शुक्रवारी रात्री दहा-अकराच्या सुमारास ड्रॉवरचे कुलूप तोडून रोकड चोरून पसार झाले. फौजदार काळुराम लांडगे अधिक तपास करत आहेत.