कर्मचार्‍यांची बदनामी करणार्‍या आरोग्य सभापतींचा निषेध

0

नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सायली रोशन जाधव यांची पत्रकार परीषदेत माहिती

चाळीसगाव । ज्या न.पा.कर्मचार्‍यांमुळे नगरपालिकेला स्वच्छतेचे बक्षीस मिळाले त्या कर्मचार्‍यांचा कामचुकार, हरामखोर, फुकटे अस अपमानजनक शब्द वापूरन बदनामी करणार्‍या न.पा.आरोग्य सभापती याचा न.पा.च्या अपक्ष नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सायली रोशन जाधव यांनी पत्रकार परिषद घेवून दि. २५ सप्टेंबर २०१७ रोजी निषेध केला असून त्यांच्या विरोधात तक्रारी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर महिला सफाई कर्मचार्‍यांनी देखील या विरोधात आवाज उठवला. त्याचप्रमाणे अखिल भारती सफाई मजूदर काँग्रेस युनियनच्या वतीने आरोग्य सभापतींनी अशा प्रकारचे कामगाराबाबत सुरू असलेली बाब योग्य नाही असे म्हटले आहे.

चाळीगसाव नगरपालिकेच्या प्रभाग १३ च्या अपक्ष नगरसेविका सायली रोशन जाधव सांगितले की, २० सप्टेंबर रोजीची घटना आरोग्य सभापती घुष्णेश्‍वर पाटील यांनी नाटकी व सोप्या पद्धतीने जनतेसमोर मांडून सहानुभूती मिळवण्याच्या उद्देशाने दि. २१ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यात माझे पती रोशन जाधव व त्यांच्या सहकार्‍यांच्या नावाचा उल्लेख करून मारहाण केल्याचा आरोप करणारी बातमी प्रकाशीत केली. त्यात माझ्या पतीचा कुठलाही संबंध नाही. ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते व तसा काही प्रकार घडला नाही. उलट आरोग्य सभापतींनी सर्व कर्मचार्‍यांना हरामखोर, कामचुकार, ४० वर्षापासून फुकटचा व हरामाचा पगार घेता, अशा अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करण्याचा प्रयत्ना केला. तसेच आरोग्य निरीक्षकांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची चर्चा न.पा.परिणरात होती, असे सांगून त्यांच्या या वागणुकीमुळे कर्मचारी अधिकार्‍यांना काम करणे अवघड झाले असून याबाबतची चौकशी सक्षम व काम स्वतंत्र अधिकार्‍यांमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी केली. सर्व सन्माननीय नगरसेवक व जनतेने अशा विघ्नसंतोषी लोकांना पाठिंबा न देता मुख्याधिकारी व त्यांचे सर्व् अधिकारी कर्मचार्‍या यांच्या पाठिशी राहून शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी त्यांनी केले. त्या सफाई कर्मचारी कुटुंबातील असून राखीव प्रभागातून निवडून आल्या आहेत. त्यांची सासू, दिर, जेठ हे २० वर्षापासून न.पा.कर्मचारी म्हणून काम करतात. अनेक वॉर्डात काम करत असतांना त्यांच्या विरोधात तक्रार नाही. जेठ राकेश जाधव हे गटनेत्याच्या वार्डात काम करतात. त्याची तक्रार नाही. मग न.प.कर्मचार्‍यांच्या घरातून नगरसेवक होणे गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

घृष्णेश्‍वर पाटील हे द्वेशातून माझे कुटुंबातील लोक आरोगय निरीक्षक यांच्या वरील आरोप व जन्म मृत्यू दाखल्यांसाठी पैशांची मागणी याबाबत पत्रकार बांधवांनी घृष्णेश्‍वर पाटीलांकडून पुरावे मागावेत व याबाबत कोणाकडे काही तक्रार आहे का याबाबतचे मत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चाळीसगाव नगरपालिकेचा कारभार हे घृष्णेश्‍वर पाटील चालवत आहेत. पक्षाचे पद आणि सोचा गैरवापर करून त्यांनी न.पा.च्या विविध निविदा, ठेके, कामे विशिष्ट लोकांकडून भागीदारीने करून स्वतःची मक्तेदारी निर्माण केली. महत्वाचे निर्णय नगराध्यक्षा या घेत असू विशिष्ट लोक ते निर्णय घेतात. नगराध्यक्षा या नामधारी आहेत. प्रत्येक कामात कमीशन मागतात. कमीशन न दिल्यास बिले निघत नाहीत. दलीत वस्तीच्या कामात दिरंगाई होते याबाबत लोकायुक्त जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करणार असून त्यांना दुसर्‍यांना गुंड म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे का, असे देखील त्यांनी सांगितले. माझ्या पतीचा कुठेही काही संबंध नसतांना देखील करणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले. न.पा.भ्रष्टाचार व भयमुक्त आणि ठेकेदारांकडून कमीशन मुक्त करण्याचा माझा निर्धार असून न.पा.च्या उपाध्यक्षा, सर्व नगरसेवक, नगरसेविका, गटनेते यांच्या विषयी काही तक्रार नाही. आरोग्य सभापती घृष्णेश्‍वर पाटील यांच्या अनागोंदी, अराजकता व मनमानी विरूद्ध लढा असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी सफाई महिला कर्मचारी निर्मला जाधव, अनिता लोट यांनी आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करतो. आम्ही कामचुकार असल्याचा आरोप चुकीचे आहे.