धुळे । जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारीअधिकारी गंगाथरन देवराजन यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यांनी पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना अधिकारी व कर्मचार्यांना केल्या. कामावर येताना कुणीही ‘जीन्स पँट’ घालून येऊ नये, कर्मचार्यांजवळ ओळखपत्र असावे, परिचरांनी ड्रेसकोडमध्येच यावे, असा शिस्तीचा पाठ घालून दिला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कळवण (नाशिक) येथील गंगाथरन देवराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीईओ देवराजन यांनी शुक्रवारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडून पदभार स्वीकारला. कामाची सूत्रे हातात घेतल्यानंतर गंगाथरन यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचार्यांना योग्य त्या सूचना केल्या. यात त्यांनी कार्यालयात सर्वांनी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. सर्व फाईल्स, आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत, कर्मचार्यांनी दररोज कामावर सकाळी 10 वाजता येणे आवश्यक आहे, त्यांनी आल्याबरोबर थम्ब् करावे, कार्यालयात आल्यानंतरकाम सोडून कुणीही बाहेर जाऊ नये, त्यासंदर्भात विभाग प्रमुखांची परवानगी घ्यावी. त्याचबरोबर कामावर येतांना कर्मचार्यांनी जिन्स पँट घालू येऊ नये, तर साधे कपडे परिधान करावेत, ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे, परिचरांनी नेहमी पोषाखातच कामावर यावे; हा सर्व बदल येत्या महिनाअखेरपर्यंत करण्यात यावा. त्यानंतर कुणीही नियम मोडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.