पिंपरी : बँक कर्मचार्याकडे खात्यावर जमा करण्यासाठी दिलेला धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता दुसर्याच खात्यावर जमा करून दोन लाखांची फसवणूक केली. ही घटना पिंपरीतील पंजाब नॅशनल बँकेत 22 नोव्हेंबर रोजी घडली. बँक कर्मचारी अक्षय मोहोळ आणि सुनील शंकर पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सादीक अजरूध्दीन शेख (वय 20, रा. विठ्ठल हौसिंग सोसायटी, ओटा स्कीम, निगडी) याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पिंपरीतील पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे. फिर्यादी 22 नोव्हेंबर रोजी त्याच्या वडिलांच्या खात्यावर दोन लाखांचा धनादेश जमा करण्यासाठी गेला होता. धनादेश आरोपी अक्षय मोहोळ यांच्याकडे दिला होता. मोहोळ याने धनादेश फिर्यादीच्या वडिलांच्या खात्यावर जमा न करता सुनिल शंकर पाटील यांच्या खात्यावर जमा करून फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.