कर्मवीर विद्यालयास ई-लर्निंग संच भेट

0

राजगुरुनगर : वाडा (ता.खेड) येथील कर्मवीर विद्यालय या शाळेस रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने ई-लर्निंग संच भेट देण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष प्रविण वाईकर, माऊली करंडे, राहुल वाळुंज, पवन कासवा उपस्थित होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक होकर, ग्रा. पं. सदस्य कुमुदिनी केदारी, माजी विद्यार्थी संघाचे सचिव दीपक कहाणे, दिलिप बच्चे, शशिकांत पावडे आदींनी ई-लर्निंग संच स्विकारला .यावेळी बोलताना क्लबचे अध्यक्ष वाईकर यांनी डिजिटल काळची पावले ओळखून वेगवेगळ्या तंत्रज्ञान वापर आपल्या शिक्षण पध्दती मध्ये त्याचा वापर केला पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दिलीप बच्चे यांनी केले.