कर्‍हातीरी चंदुकाकांना जनसमुदायाची श्रद्धांजली

0

सासवड । माजी आमदार स्वर्गीय चंदुकाका जगताप यांना सासवड येथील कर्‍हा नदीच्या तीरावरील कमळेश्‍वर घाटावर दशक्रिया विधीनिमित्त हजारोंच्या जनसमुदायाने श्रद्धांजली वाहिली. माजी आमदार माणिकराव जगताप म्हणाले, सरदार गोदाजी राजेंच्या घराण्यातील चंदुकाका जगताप एक रत्न होते. त्यांनी सासवडला देशपातळीवर नावलौकिक मिळवून दिला.

ग्रामीण भागात शिक्षण पोहचवले
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, चंदुकाकांनी शिक्षण, राजकारण, क्रीडा, सहकार, समाजकारण आदी क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली. ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव म्हणाले, नियतीपुढे कोणाचे चालत नाही. राजकारणात काकांनी अनेक कार्यकर्ते घडविले. सर्वच क्षेत्रांत त्यांनी नावलौकिक कमावला.

मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार बाबुराव पाचर्णे, संग्राम थोपटे, मोहनराव कदम, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार अशोक पवार, शरद ढमाले, अशोक टेकावडे, विश्‍वजित कदम, अंकुश काकडे, प्रशांत जगताप, अभयकुमार साळुंखे, ऋशीकांत शिंदे, गणपतराव फुलावडे, मंगलदास बांदल, निवृत्ती गवारी, जालिंदर कामठे, दत्ता झुरंगे, दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, हेमंत माहूरकर, राजाभाऊ पासलकर, अतुल म्हस्के, मार्तंड भोंडे, विनोद जळक, आजी- माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष, सचिव आदींनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.