भुसावळ । मार्चअखेर उलटूनही कराची थकबाकी न भरल्याने नगरपालिका प्रशासनातर्फे शनिवार 1 रोजी पासून धडक मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, वसंत टॉकीज, बीएसएनएल एक्स्चेंज यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने वसंत टॉकीज सील केली असून बीएसएनएल व स्टेट बँकेने मुदत वाढवून मागितल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. यामध्ये स्टेट बँकेकडे एक कोटी रुपयांची थकबाकी आहे. शहरात एकूण 36 हजार 750 करदाते आहे. त्यापैकी फक्त 10 हजारांच्या जवळपास नागरिकांनी कराचा भरणा केला असून उर्वरित 26 हजार नागरिकांकडे पालिकेची मोठ्या प्रमाणावर कर थकबाकी आहे. यामध्ये दुकानदार, मोबाईल टॉवर, रुग्णालय व बंगल्यांचा समावेश आहे.
पथकात यांचा होता समावेश
कारवाईदरम्यान या पथकात सील करतांना मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, अखतर खान, शे. परवेज अहमद, सुभाष ठाकुर, महेश चौधरी, अनिल मंडवाडे, शाम गिरी, रमेश सपकाळे, कैलास सपकाळे, राजेंद्र चौधरी, गोपाल पाली, राजेंद्र पाटील, प्रमोद मेढे, व्ही.सी. राठोड, पी.डी. पवार, अनिल आहुजा, राजेश पाटील, शे. अन्वर, संजय सुरवाडे, शे. मुश्ताक, संजय भिरुड व इतर कर्मचारी हजर होते.