कलमाडी राजकारणात सक्रिय झाले कधी?

0

पुणे । बाजीराव रस्त्यावर सुरेश कलमाडी राजकारण सक्रिय झाल्याबद्दल अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहे. पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी तसेच माजी नगरसेवक जयसिंग भोसले यांची नावे या बॅनरवर झळकत आहेत. या बॅनरवर कलमाडीचे राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याबद्दल स्वागत करण्यात आले आहे. मात्र हा बॅनर पहिल्यानंतर कलमाडी राजकारणात कधी आणि केव्हा सक्रिय झाले, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. यंदा ते गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. हा सहभाग म्हणजे त्यांचा राजकारणात सक्रिय असल्याचे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष सदानंद शेट्टी व जयसिंग भोसले यांनी हे शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत.