‘कलयुग की पूर्व संध्या’ पुस्तकाचे प्रकाशन

0

मुंबई । भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी तसेच सक्तवसुली संचालनालयाच्या पश्चिम विभागाचे विशेष महासंचालक विनीत अग्रवाल यांच्या ‘कलयुग की पूर्व संध्या’ या द्विभाषिक पुस्तकाचे मंगळवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याहस्ते राजभवनात प्रकाशन आले. याप्रसंगी प्रसिद्ध पटकथा लेखक जावेद अख्तर, वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक फणसाळकर, प्रधान सचिव वंदना कृष्णा, अभिनेते स्वप्नील जोशी तसेच विनीत अग्रवाल यांची उपस्थिती होती.