कलाकारांची पालिकेवर नाराजी

0

पुणे । सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात महापालिकेने स्थानिक कलाकारांना डावलल्याची भावना व्यक्त करीत बालगंधर्व रंगमंदिर परिवारच्या कलाकारांनी बालगंधर्व नाट्यगृहासमोर घोषणाबाजी करीत पालिकेचा निषेध केला.

गणेशोत्सवासाठी महापालिकेने अनेक उपक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम सादर करण्यात आला. परंतु पुण्यातील कलाकार उपलब्ध असताना महापालिकेने त्यांना आपली कला सादर न करू देता बाहेरगावच्या कलाकरांना संधी दिल्याबद्दल शहरातील कलाकार, तंत्रज्ञ यांनी नाराजी व्यक्त केली. तब्बल दोन कोटी खर्चून साजरे केले असताना त्यात स्थानिक कलाकरांना स्थान देण्यात आले नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.