कलाल समाजातील गुणवंत विद्यार्थ्यार्ंचा गुणगौरव सोहळा

0

शहादा। तळोदा शहरातील कलाल समाज पंचवाडीत गुणवंत विद्यार्थाचा गुणगौरव सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यात दहावी बारावीत ज्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीनी यश संपादन केले त्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा घेण्यात आला.सोबतच विविध पदावर कार्य करताना ज्याना पदोन्नती मिळाली असे व आपल्या नोकरीचा काळात सेवानिवृत्त झाले अश्या लोकांचा सेवापुर्ती सोहळा देखील घेण्यात आला. या कार्यक्रमात तळोदा, नंदुरबार, शहादा, शिरपुर ,नाशिक येथील समाज मंडळीना बोलाविव्यात आले होते. गुणवंत विद्यार्थांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवुन गौरवण्यात आले. त्यात प्रथम इयत्ता 12 वीत समाजात प्रथम जान्हवी कलाल, द्वितीय मिलींद कलाल,, तृतीय मयुर कलाल तर उत्तेजनार्थ कु कल्याणी कलाल, चित्रलेखा इंगळे आणि संपूर्ण कलाल समाजात जास्त गुण मिळवून प्रथम आलेली शहाद्याची कु. पायल सोनवणे हीचा देखील मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला .

समाजात विशेष प्रावीण्य
इयत्ता 10 वीत गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे सिध्दार्थ कलाल, गौरेश कलाल, दोघे सी.बी.एस.सी.पॅटर्न प्रथम तर तेजस गिरणारे, दर्शन बागुल, श्रेया सरवारे,लकी कलाल, रोहित कलाल ,चेतन कलाल, हर्षल सोनवणे, कोमल सोनवणे आदिंचा गौरव करण्यात आला.समाजात विशेष प्रावीण्य मिळविणारे डॉ.तुषार जावरे( शिरपुर)डॉ. ऋषिकेष सुर्यवंशी (शिरपुर )स्वाती कलाल(तळोदा) समाजातील पहिली महिला राजपत्रीत अधिकारी यांचा देखील गौरव करण्यात आला .सेवापुर्तीबद्दल राज्यपरिवहन महामंडळातील शशिकांत कलाल व शेठ.के.डी.हायस्कूलच्या शिक्षीका भारती कलाल यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील सर्व घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे सचिव ए. व्ही. कलाल यानी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबारचे माजी समाज अध्यक्ष भिकासा गिरणारे तर प्रमुख पाहुणे तळोदा समाजाचे माजी उपाध्यक्ष नारायण कलाल होते. कु. पायल सोनवणे, स्वाती कलाल ,डॉ. तुषार जावरे ,ऋषिकेष सूर्यवंशी , प्रा गणेश सोनवणे, नारायणसा कलाल, भिकासा गिरणारे यानी मनोगत व्यक्त केली.सूत्रसंचालन व आभार संजय कलाल यानी मानले.