जळगाव । चित्रकलेतून जगण्याची समृद्धी मिळत असल्याने चित्र काढतांना चित्रातील भाव ओळखणे महत्त्वाचे असते. ज्याला ते ओळखता आले आणि त्या भावरेषा रेखाटता आल्या तो उत्कृष्ट चित्राची निर्मिती करू शकतो. चित्रकलेतूनच वेगवेगळ्या कलांना वाव मिळत असुन जळगावमध्ये सचिन मुसळे यांच्यासह कलाशिक्षकांकडून चित्रकलेत चांगले विद्यार्थी घडत असल्याचे समाधान आहे असे गौरोद्गार जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले. भाऊंच्या उद्यानातील वानखेडे कलादानामध्ये सचिन मुसळे आयोजित विलोभनीय चित्रप्रदर्शन ‘रंगोत्सव-2017’चे उद्घाटन श्री.जैन यांच्याहस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी सचिन मुसळे, अनिष शाह, डॉ.सतीश शिदांडकर, सुनील महाजन, डॉ.योगेंद्र कासट, सुहास चौधरी, जितेन्द्र चौधरी, निरंजन शेलार, प्रताप कुमावत, कैलास विसावे, राजेश यावलकर, मनोज जंजालकर, प्रराग चौधरी, मिलिंद इंगळे, भिका पाटील आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
आज चित्रशाळेचे आयोजन
भाऊंचे उद्यानात रविवार 24 रोजी असलेल्या रंगोत्सव प्रदर्शनात सचिन मुसळे यांच्यासह, विद्यार्थ्यांनी व कलाशिक्षकांनी साकारलेल्या उत्कृष्ट पेटींगचे प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. आज 23 रोजी आजी-आजोबांना रंगाच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी भव्य चित्रशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रशाळेप्रसंगी विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आर.सी.बाफना ज्वेलर्सचे रतनलालजी बाफना, केशवस्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित राहणार आहे.