कलाशिक्षक योगेश सोमवंशींचा गौरव

0

नवापूर । सारंगखेडा येथील ‘चेतक महोत्सव 2017’ स्पर्धेत नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कुलचे कला शिक्षक योगेश सोमवंशी यांचा कला कृतीला ज्युरी अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. या चेतक महोत्सवाचे आयोजक माजी जि.प.सदस्य जयपालसिंग रावल यांनी व उपस्थित मान्यवरांनी योगेश सोमवंशी यांचा चित्र कला कृतीचे कौतुक करुन त्यांचा ट्राँफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

राज्यभरातील कलाकारांचा स्पर्धेत सहभाग
सारंगखेडा येथील प्रसिध्द यात्रेत अनेक राज्यातुन कलाकार सहभाग झाले होते. योगेश सोमवंशी यांनी यात्रा व त्यातुन कलाकृती समर्पक रेखाटली होती हे पाहुन अनेकांनी चित्राचे कौतुक केले. या चित्रांच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली आहे. अनेक कला कृतीतुन परिक्षकांनी त्यांची स्तुत्य निवड केली. यावेळी नाशिकचे संजय साबळे चोपड्याचे राजेंद्र महाजन सारंगखेडा ‘चेतक फेस्टीवल 2017’ चे आयोजक व कलाकार उपस्थित होते. योगेश सोमवंशी यांचे श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिवाराने अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले आहे.