कलियुगात लेखणीसारखे धारदार शस्त्र नाही

0

अ.भा.ग्रा.पत्रकार संघातर्फे गिरणा परिसर नवरत्न पुरस्कार सोहळा संपन्न
डॉ. संजीव पाटील यांचे प्रतिपादन; भडगाव येथील पत्रकार दिन उत्साहात

भडगाव – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगावतर्फे पत्रकार दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव येथे अ.भा.ग्रामिण पत्रकार संघ व संजय पाटील युवा प्रतिष्ठाण तसेच माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्धमाने रक्तगट व रक्तदान, हिमोग्लोबिन चाचणीसह आदर्श शेतकरी समाजसेवक, शैक्षणिक, वैद्यकिय व प्रशासकीय आधिकारी तसेच पत्रकार बांधवाना गिरणा परिसर नवरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. संजीव पाटील संचालक दूध संघ जळगाव यांच्या अध्यक्षतेत तर चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपविभागीय अधिकारी केशव पातोंड, तहसिलदार सी.एम.वाघ, पो.नि. धनंजय येरुळे तालुका वैद्यकीय आ.डॉ सुचिता आकाडे, डॉ.अजय सपकाळ, डॉ.प्रशांत शेळके, दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक युवराज परदेशी, राजेंद्र पाटील, अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे केंद्रीय सदस्य लक्ष्मण सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष भगवान सोनार, ललित खरे पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अजय कोतकर मा.शिक्षण सभापती एकनाथ महाजन सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील पं.स. माजी सभापती संभाजी भोसले, प.सं.सदस्या आर्चना पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडाला. या कार्यक्रमास खा.ए.टी.पाटील माजी आमदार दिलीप वाघ, नगरसेविका योजना पाटील आदी राजकिय सामाजिक व शैक्षणिक प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमच्या प्रमुख मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकाराच्या लिखाणातुन रोज घडाणार्‍या महत्त्वाचे घडामोडी समाजापर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकार करीत असतो. अनेकांचे भवितव्य पत्रकार घडविण्या सोबत येणारे चांगले आंनदाच्या घटना लिहीतांना निर्भीड व सडेतोड लिखाण पत्रकार हा करीत असतो.

अध्यक्षीय भाषणात डॉ.संजीव पाटील म्हणाले की, पूर्वी तलवारीसारखे शस्र धारदार होते. त्यावर लढाई लढली जात होती. मात्र कलियुगात लेखणी सारखे तलवारी पेक्षाही धारदार शस्र दुसरे कोणतेच नाही, मात्र परीस्थिनुसार लिखाण करण्याची कला पत्रकारामध्येच असते असे सांगून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डॉ. विशाल पाटील जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अ.भा.ग्रा.पत्रकार संघाने घेतलेला लोकाभिमुख व जनहिताच्या कामाचे कौतुक यावेळी केले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमप्रसंगी जेष्ठ पत्रकार तथा दैनिक जनशक्तिचे निवासी संपादक युवराज परदेशी, राजेंद्र पाटील, देविदास पाटील, अजय कोतकर, भगवान सोनार, भानुदास महाजन, लक्ष्मण सुर्यवंशी, ललित खरे, श्यामकांत सराफ, रविद्र पाटील, आंनदा महाजन, डॉ.बी.बी. भोसले, संजय पाटील, प्रशांत येवले, सुपडू खेडकर, संजय कोतकर, संजय महाजन, नितीन सोनार, नाना पाटील, दिपक अमृतकार, कैलास महाजन, विलास पाटील, मनीष सोनवणे, मिलींद दुसाणे, प्रकाश जगताप, किशोर महाजन, राकेश महाजन, महेंद्र अग्रवाल आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अ.भा.ग्रा.संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी तसेच प्रा.आ.केद्राचे पदाधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रविण पाटील व रोकडे यांनी तर आभार राजेंद्र चव्हाण यांनी मानले.