कल्याण जिल्हा न्यायालयात चोरी

0

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात भुरट्या चोरट्यानी एकच धुमाकूळ घातला असून, आता चोरट्यामुळे न्यायालये ही सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायालयातील वरिष्ठ लिपिक एस. आर. नागाळे आपला मोबाइल आणि पर्स रूममध्ये ठेवून आपल्या रूमला कडी लावत कामानिमित्त पहिल्या मजल्यावर गेल्या होत्या. 10 मिनिटांनी परतल्यानंतर त्यांच्या रूमची कडी काढून अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पर्समध्ये त्यांचा चालू मोबाइल, 1000 रुपये बँकांची एटीएम कार्ड आणि घराची चावी असा ऐवज होता. दरम्यान, याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात नागाळे यांनी तक्रार नोंदवली असून, या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत याप्रकरणी पोलीस हवालदार काटकर पुढील तपास करत आहेत.