कल्याण-डोंबिवलीत चोरट्यांच्या रडारवर

0

कल्याण : कल्याण पूर्वेकडील लोकग्राम परिसरात राहणारी 58 वर्षीय महिला पूना लिंक रोड येथून पायी जात असताना समोरच्या दिशेने भरधाव वेगाने एक दुचाकी आली. या दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने या महिलेच्या गळ्यावर थाप मारत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून धूम ठोकली. तिसगाव परिसरातील जरीमरी नगरमध्ये राहणारी महिला काटेमनिवली नाका येथून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली.

या दुचाकीवरील तरुणांनी क्षणार्धात या महिलेच्या गळ्यातील 22 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. याच चोरट्यानी या रस्त्यावर चालणार्या आणखी तीन महिलांचे एकूण मिळून 1 लाख 36 हजार रुपयांचे दागिने खेचून पसार झाले. या प्रकरणी महिलांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली पूर्वेकडील ठाकुर्ली परिसरात ही चेन स्नेचिंग ची घटना घडली आहे. ठाकुर्ली 90 फिट रोड बालाजी आंगणमध्ये राहणारी 52 वर्षीय महिला म्हसोबा चौक येथे भाजी घेण्यासाठी गेली होती. या दरम्यान समोरून एक रेनकोट घातलेला व्यक्ती आला. त्याने या महिलेच्या गळ्यातील 42 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खेचून पळ काढत रस्त्याच्या दुसर्या बाजूला दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराच्या मागे बसून क्षणार्धात पसार झाला. या प्रकरणी महिलेने डोंबिवली ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.