अमळनेर। तालुक्यातील कळमसरे येथून जवळच असलेल्या तालुक्यातील निम येथे पिंप्री- सोनवद गटाचे जि.प. सदस्य गोपाल चौधरी यांचा नागरी सत्काराचे आयोजन आज 16 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता सहकार राज्य मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निम ग्रामपंचायत, विकास सोसायटी व ग्रामस्थांकडून करण्यात आले असून, प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद आमदार स्मिताताई वाघ, आमदार शिरीष चौधरी, कळमसरे- मारवड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, कृउबा समितीचे संचालक प्रफुल्ल पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख अनिल अंबर पाटील, जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पिंगळे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गोपाल चौधरी मित्र परिवाराने केले आहे.