कळमसरे येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

0

अमळनेर । तालुक्यातील कळमसरे येथे दुर्गानगर चौकात महात्मा ज्योतिराव फुले व हनुमान जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी गावातील तरुणांनी महाप्रसादाचा कार्यक्रम व प्रतिमापुजन करण्यात आले. ह.भ.प. बजरंग महाराज व विकास चौधरी यांनी सपत्नीक प्रतिमा पूजन केले. गावात सर्वत्र सवाद्यक मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंघी महात्मा ज्योतिराव फुले यांचा सजीव देखावा तयार करण्यात आला होता. हनुमान मदिरावर पूजा करण्यात आली मिरवणुकीत गावातील सर्वे समाज बांधवानी भाग घेत मोठ्या उत्सवात सहभाग घेतला होता.

यशस्वितेसाठी साहेबराव माळी, संजय चौधरी, दीनेश चौधरी, अशोक चौधरी, बाबूलाल पाटील, योगेन्द्रसिंह पाटिल, पिंटू राजपूत, आबा महाजन, समाधान पटिल, गणेश पाटिल, मनोज पाटिल, विकास चौधरी, विकास पाटिल, रोशन चौधरी, योगेश पाटिल, विश्वास चौधरी, हेमन्त चौधरी, चेतन चौधरी, सचिन चौधरी विजय महाले सुरेश महाजन, तुकाराम टेलर, लक्ष्मण चौधरी, दीपक चौधरी आदी हजर होते.