ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. संध्या खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वीच्या डीन डॉ. सी. मैत्रा सेवानिवृत्त झाल्याने हे अधिष्ठाता पद रिक्त होते.
ही नियुक्ती भारतीय आयुर्विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मान्यतेस अधीन राहून केली असून अधिष्ठात्यांचा कालावधी दोन वर्षाचा आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. अद्याप डॉ. खडसे यांनी कार्यभार स्वीकारलेला नाही.