कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात डॉ.गुडालपे सँचेझ यांचे व्याख्यान

0

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात आज सेटीस् विद्यापीठ, मेक्सिको येथील डॉ.गुडालपे सँचेझ यांचे व्याख्यान झाले.

एम.बी.ए.च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्याख्याने आयोजित करण्यात आले असून अर्थ व्यवस्थापन, अर्थशास्त्र, जागतिक वाणिज्य व व्यापार, ज्ञान जागतिकीकरण, जागतिक अर्थव्यवस्था व प्रणाली, जागतिक बाजारपेठ ह्या विषयांवर महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना डॉ.गुडालपे सँचेझ या देणार आहेत.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान व आत्मविश्वास तर वाढलेच त्या बरोबर त्यांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील व जागतिक वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील घडामोडींची माहिती मिळणार आहे. या माध्यमातून भविष्यात त्यांना उच्च शिक्षण व नोकरीसाठी भरपूर संधी उपलब्ध होणार आहे.

व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ.सीमा जोशी हयांच्या निमत्रंणावरुन डॉ.गुडालपे सँचेझ या दोन आठवडयांसाठी विद्यापीठात आल्या आहेत. मेक्सिको येथील सेटीस् विद्यापीठ ही जागतिक मानांकन प्राप्त खाजगी शौक्षणिक संस्था आहे. या विद्यापीठासोबत सामंजस्य करार झालेला असून दरवर्षी तेथील व्याख्यात्यांना बोलवून व्याख्यानाचे आयोजन केले जाते.