कवयित्री बहीणाबाई चाैधरी यांच्या जयंतीनिमित्त रंगले काव्यसंमेलन !

0

जळगाव- कवयित्री बहीणाबाई चाैधरी यांच्या जयंतीनिमित्त अाशादीप महिला वसतिगृहात निमंत्रित महिला कवयित्रींचे काव्यसंमेलन झाले. अाशादीप महिला वसतिगृहाच्या अधिक्षिका अार. पी. झाेेपे अाणि निमंत्रित कयवित्रींच्या हस्ते बहिणाबाई चाैधरी अाणि सावित्रीबाई फुले यांना माल्यार्पण करण्यात अाले.

डाॅ. शकुंतला चव्हाण यांनी ‘लेक वाचवा’ या विषयावर ‘जन्म घेऊ द्या कन्या, करा तिचा विचार’ ही कविता सादर केली. त्यानंतर विमल वाणी यांनी ‘अाता वेगळं निघायचं बाई’ हे भारुड, पुष्पा साळवे यांनी ‘बाईपण निभावताना घालमेल हाेते जीवाची’ ही बाईपण कविता, प्रा. डाॅ. सुषमा तायडे यांनी ‘पानगळ साेसताना मनी दाहे नवी पालवी’ ही पानगळ कविता, इंदीरा जाधव यांनी ‘मांडू कशी मी माझी व्यथा’ ही व्यथा कविता, पुष्पलता काेळी यांनी ‘अाजकालच्या पाेरी’, के.यु.शेख यांनी ‘जीवन जगताना किती असह्य हाेतात हे क्षण’ ही क्षण कविता सादर करीत अाशादीपच्या मुलींना जीवनातील अनेक पैलू उलगडून दाखवले. स्त्रीत्वाची कथा, व्यथा तसेच यामधून कसा मार्ग काढावा? याबाबतही मार्गदर्शन केले. काेणत्याही परीस्थितीला हारुन न जाता जिद्दीने सामाेरे जावे हे या कवितांमधून उलगडले. गंगा सपकाळे हिने अहिराणी कविता सादर केली. याेगिता काेळी, माधुरी रणदिवे, रमिला माेरे, मिनाक्षी महाजन यांनी मनाेगत व्यक्त केले. पुष्पा साळवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुषमा तायडे यांनी अाभार मानले.