पिंपरी:रामदास फुटाणे नवोदित कवींना मार्गदर्शन करताना म्हणाले की, कविता एकसारख्या असू नयेत. अनेक कवितांचा अभ्यास करा. इतरांच्या कवितांचे वाचन करून तुमची वैचारिक बैठक निश्चित झाल्यानंतरच कविता लिहा. कवितेमधुन आपला आत्म्याचा, वर्गाचा आणि समाजाचा आतला आवाज दर्शविता आला पाहिजे असेही फुटाणे म्हणाले. गदिमा काव्यस्पर्धेत पारितोषिक मिळाले म्हणून कविता लिहायचे थांबू नका. आपल्या पात्रतेपेक्षा जास्त प्रसिध्दी मिळाली की माणसे खुजी होतात. प्रसिध्दी आपल्या खांद्याएवढीच हवी आहे. प्रसिध्दी आणि कीर्ती वेगवेगळी आहे. स्वतः बडबड करतो ती प्रसिध्दी आणि इतर करतात ती कीर्ती असते.
गदीमांचे स्मारक हवे
हे देखील वाचा
सुमित्र माडगूळकर म्हणाले की, माझा जन्म माडगूळकर कुटुंबात झाला असला तरी खरे वारसदार आपणच आहात. मात्र आजपर्यंत गदिमांचे स्मारक झालेलेल नाही, हे दुःखद आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहाचे काम गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात पूर्ण व्हावे. गदिमा राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे 500 कवींनी सहभाग नोंदवला. त्यातील 100 कवींना क व्यवाचनासाठी निमंत्रित करण्यात आले. परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक माधव राजगुरू, रानकवी तुकाराम धांडे, पत्रकार भालचंद्र मगदूम यांनी काम पाहिले. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी तर सूत्रसंचालन प्रा.दिगंबर ढोकले यांनी केले. आभार मुकुंद आवटे यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक डॉ. स्वप्नील चौधरी यांचा, द्वितीय क्रमांक अनंत राऊत यांचा, तृतीय क्रमांक सुमित गुणवंत यांचा, चतुर्थ क्रमांक शितल गाजरे यांचा, पाचवा क्रमांक निकिता बहिरट यांचा आला. तर कविता काळे, अंकुश आरेकर, अविनाश भामरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. यावेळी या विजेत्यांना रोख रक्कम व स्मृती चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.