वसई । कवीने कवितेची साधना करावी. भरपूर वाचन, मनन व चिंतन करावे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मुंबई अध्यक्ष जयप्रकाश घुमटकर यांनी बोलताना केले. ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पालघर शाखा यांच्या वतीने रविवारी विरार पश्चिमेकडील विद्याविहार एज्यूकेशन सोसायटीच्या सभागृहात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. वसई जनता सहकारी बँकेचे संचालक जयवंत नाईक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कविसंमेलनाला पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कवी उपस्थित होते. कविता प्रभावीपणे लिहिली पाहिजे. कवितेतील शब्दांमध्ये आशयाची ताकद हवी. असे ते म्हणाले. कवीने त्याकरिता वाचन, निरिक्षण करुन प्रयत्नपूर्वक कवितेचा अभ्यास केला पाहिजे.
नियुक्तीपत्र प्रदान
यावेळी नव्याने नियुक्त केलेल्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली जव्हार, डहाणू, विक्रमगड, पालघर, ठाणे, भाईंदर, वसई अशा दूरदूरहून कवींनी आपली उपस्थिती लावली. गजानन राणे यांनी लिहीलेल्या सप्तसूर जीवन जगण्याचे या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. अध्यक्ष अ. ना. रसनकुटे, नयन जैन, उमाकांत वाघ यांनी कार्यामाचे आयोजन केले होते.