कवी दिनेश चव्हाण ’कलातपस्वी’ पुरस्काराने सन्मानित

0

रेश्माई बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषदतर्फे पुरस्काराचे वितरण

चाळीसगाव – रेश्माई बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांचा कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल कलातपस्वी पुरस्कार देऊन चोपडा येथे शनिवार 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या रंगारंग व्याख्यानमालेत सन्मानित करण्यात आले. भारतीय संविधान, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन माजी आमदार कैलास पाटील, विधान परिषदेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, नगराध्यक्षा, नगरसेवक यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांच्या सोबत, डॉ.संजीवकुमार सोनवणे, अहिराणी नाट्य कलावन्त प्रवीण माळी, जेष्ठ साहित्यीक अशोक सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, राजेंद्र पारे आदी जेष्ठ श्रेष्ठ साहित्यिक, चोपड्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र पारे यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रातून या पुरस्कारासाठी एक कमिटी नेमली होती. त्यातून चित्रकार दिनेश चव्हाण यांना कला क्षेत्रासाठी निवडण्यात आले. त्यांचे चित्रशैली सर्वांना परिचित आहेच. सरांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.