जळगाव । प्रसिद्ध कथाकार, कवी, स्तंभलेखक कै.नारायण शिरसाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 17 सप्टेंबरला तिसरे प्रेरणा साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. भाऊसाहेब राऊत विद्यालयात सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. कविवर्य कै.नारायण शिरसाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने तीन वर्षांपासून संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन महिला विशेष असेल. प्रसिद्ध कादंबरीकार पद्मावती जावळे (मुंबई) अध्यक्षस्थानी असतील.
तर संमेलनाचे उद्घाटन सकाळी साडेदहाला कवयित्री- निवेदिका प्रा. विजया मारोतकर (नागपूर) यांच्या हस्ते होणार असून, कवयित्री प्रा. माया धुप्पड, कवी, डी. बी. जगत्पुरीया, नगरसेवक कैलास सोनवणे, वीणा प्रकाशनच्या संचालिका वीणा शिरसाळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. प्रा. विजया मारोतकर, मिना सैंदाणे, प्रियंका सपकाळे, विशाखा कुळकर्णी- ठोंबरे यांच्या उपस्थितीत कथाकथन व प्रा. विजय वाणी (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी च्या बही’ हे विडंबन नाट्य सादर करतील. उपस्थितीचे आवाहन संदीप शिरसाळे, सुरेंद्र शिरसाळे, सुनील शिरसाळे आदींनी केले आहे.