माजी महापौर कै. मधुकर पवळे राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ
पिंपरी : कष्ट, मेहनत, जिद्द व चिकाटी यांच्या जोरावरच क्रीडा क्षेत्रामध्ये यश प्राप्त होऊ शकते. जीवन आनंदी व आरोग्यदायी होण्यासाठी व्यायाम व खेळ महत्वाचे आहे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने महाराष्ट्र राज्य असोसिएशन व पुणे जिल्हा कब्बडी असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित केलेल्या माजी महापौर कै. मधुकर पवळे राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, शैलेश मोरे, शंकर काटे, राजू मिसळ, नितीन लांडगे, नगरसद्स्या अनुराधा गोफणे, सुजाता पालांडे, अश्विनी बोबडे, सुमन पवळे, माजी उपमहापौर शरद बोर्हाडे, सदाशिव नेवाळे, संदीप नेवाळे, बबनराव गाढवे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, क्रीडा अधिकारी रजाक पानसरे, क्रीडा पर्यावेक्षक विश्वास गेंगजे आदी उपस्थित होते.
खेळांना मदत करणार
महापौर राहुल जाधव म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगर हे शहर उद्योगनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून नावारूपाला येत आहे. सर्वप्रकारच्या खेळांना मदत करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. खेळाडूंना लागणार्या मैदान, प्रशिक्षीत कोच, उत्कृष्ट सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न महापालिका नक्कीच करणार आहे. तर आयुक्त श्रावण हार्डीकर म्हणाले की, स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या चिकाटी व जिद्दीचे आपण कौतुक केले पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहरामधून तयार झालेले खेळाडू राज्यस्तर, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीयस्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. तसेच शिवछत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त करून खेळाडू शहराच्या नाव लौकिकात भर पाडत आहेत.
महिला संघांमध्ये राजमाता प्रथम
महिला कबड्डीचा महापौर चषक राजमाता जिजाऊ, पुणे संघ यांनी पटकवला तर शिवशक्ती संघ, मुंबई उपविजेता ठरला. अंतिम सामना राजमाता जिजाऊ, पुणे संघ विरुध्द शिवशक्ती संघ, मुंबई यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यामध्ये राजमाता जिजाऊ, पुणे संघ यांनी शिवशक्ती, मुंबई संघ यांच्यावर 17 गुणांनी मात केली. यामध्ये उत्कृष्ठ चढाईचा पुरस्कार स्नेहल शिंदे, नेहा घाडगे, पुजा यादव, रेखा सावंत यांना मिळाला. तर उत्कृष्ठ पकडीचा पुरस्कार अंकिता जगताप, सायली केरीपाले, पौर्णिमा जेधे, रक्षा नारकर यांना मिळाला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये शिवशक्ती संघ, मुंबई यांनी हनुमान संघ यांचा 3 गुणांनी पराभव केला. या सामन्यामध्ये उत्कृष्ठ चढाईचा पुरस्कार रेखा सावंत, पुजा यादव, मृणाली रोठवे यांना मिळाला. तर, उत्कृष्ठ पकडीचा पुरस्कार रक्षा नारकर, पौर्णिमा जेधे, गीता ताजे यांना मिळाला. उपांत्य फेरीच्या दुसर्या सामन्यामध्ये राजमाता जिजाऊ, पुणे यांनी ओमसाई संघ यांच्यावर 37 गुणांनी मात केली. या सामन्यामध्ये उत्कृष्ठ चढाईचा पुरस्कार सायली केरीपाले, आफ्रिन शेख यांना मिळाला तर उत्कृष्ठ पकडीचा पुरस्कार अंकिता जगताप, अंकिता चव्हाण यांना मिळाला.
पुरूष संघांमध्ये सतेज प्रथम
सतेज संघ बाणेर, पुणे संघ पुरुष महापौर चषकाचा विजेता ठरला तर विजय संघ, मुंबई उपविजेता ठरला. पुरुष कबड्डीचा अंतिम सामन्यामध्ये सतेज संघ बाणेर पुणे यांनी विजय संघ, मुंबई यांच्यावर 4 गुणांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये उत्कृष्ठ चढाईचा पुरस्कार विनित कालेकर, अजिंक्य कापरे यांनी मिळवला. तर, उत्कृष्ठ पकडचा पुरस्कार सतिश पाटील, तुषार पाटील यांना मिळाला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये सतेज संघ पुणे यांनी महाराष्ट्र अंघ यांच्यावर दहा गुणांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये उत्कृष्ठ चढाईचा पुरस्कार विनित कालेकर, सुनिल दुबेले, चेतन थोरात, दिपक गिरी यांना मिळाला. तर उत्कृष्टपकडचा पुरस्कार सतिश पाटील, अमर चव्हाण यांनी मिळवला. उपांत्य फेरीच्या दुसर्या सामन्यामध्ये विजय स्पोर्ट्स संघाने शिवशंकर संघावर 16 गुणांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये उत्कृष्ठ चढाईचा पुरस्कार अजिंक्य कापरे, गणेश जाधव, सुरज बनसोडे यांनी मिळवला तर उत्कृष्ठ पकडचा पुरस्कार अभिषेक रामाने, सुनिल पाटील, सुनिल शिवथरकर यांनी मिळवला. या सामन्यांमध्ये दत्ता झोंझुर्डे, संदीप पायगुडे, राजेंद्र आंदेकर, योगेश यादव, कविता आल्हाट यांनी पंच म्हणून काम पहिले.