काँग्रेसकडून अंबानी आणि भाजपला चोख प्रत्युत्तर

0

नवी दिल्ली-राफेल कराराबाबाबत काँग्रेसकडून निराधार, खोटे आणि बदनामीकारक आरोप केले जात असल्याने द्योगपती अनिल अंबानी यांनी काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान याला काँग्रेसनेचोख प्रत्युत्तर दिले आहे. राफेल सौद्यात काही तरी घोळ आहे, त्यामुळेच काँग्रेसला नोटीस पाठवली असल्याचे काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी म्हटले आहे.

मला आणि माझ्या पक्षाला आलेल्या नोटिसीवरून राफेल सौद्यात घोटाळा झाल्याचे स्पष्ट होते. ही लोकशाही आहे. आम्हाला यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. अशा नोटिसा पाठवून तुम्ही सामान्यांचा आवाज दाबू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले आहे.

शेरगिल यांनी ट्विट करून भाजपावर आणि अंबानी यांच्यावर निशाणा साधला. मोदी सरकारने हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लि. (एचएएल) या सरकारी कंपनीला राफेलचे काम न देता आपल्या उद्योगपती मित्राला हे काम दिले. सरकारने राफेल करारासाठी अतिरिक्त ४२ हजार कोटी रूपये का दिले हा प्रश्न विचारण्याचा देशातील प्रत्येक करदात्याला अधिकार असल्याचे ते म्हणाले.