नवी दिल्ली-पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसने बंद पुकारला होता. या बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इंधनाचे दर दिवसेंदिवस गगणाला भिडत आहे तरी देखील भाजप आणि विशेषतः मोदी भक्तांकडून इंधन दरवाढीचे समर्थन केले जात आहे. आता काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून मोदीभक्तांना लक्ष केले आहे.
काँग्रेसने चार कार्टून ट्विट केली आहेत. २०१५ ते २०१८ या चार वर्षातली ही चार कार्टून आहेत.
'इस मासूमियत पे कौन न मर जाए ऐ ख़ुदा
लुटे जा रहे हैं और माथे पर शिकन तक नहीं' #JanKiBaat pic.twitter.com/fU4QK8Ijiq— Congress (@INCIndia) September 11, 2018
२०१५ मधल्या कार्टूनमध्ये मोदीभक्त कारमध्ये बसला आहे तो म्हणतो पेट्रोलने शंभरी गाठली तरीही माझे मत मोदींनाच. २०१६ मध्ये हाच मोदीभक्त नॅनो कारमध्ये बसला आहे. पुन्हा तो तेच म्हणतो आहे पेट्रोलने शंभरी गाठली तरीही माझे मत मोदींनाच. २०१७ च्या कार्टूनमध्ये हाच भक्त स्कूटरवर बसला आहे पुन्हा तो तेच म्हणतो आहे पेट्रोलने शंभरी गाठली तरीही माझे मत मोदींनाच. २०१८ मध्ये हाच भक्त लहान मुलांच्या सायकलवर बसलेला दाखवला आहे आणि तो म्हणतोय काहीही झाले तरीही माझे मत मोदींनाच.
या चारही कार्टूनमधून देशातली इंधन दरवाढ कशी झाली हे काँग्रेसने दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी मोदी भक्तांचीच निवड केली आहे. कारण सायकल चालवली तरीही हे भक्त मोदींनाच मत देतो असे म्हणतील असे काँग्रेसने या व्यंगचित्रातून दाखवून दिले आहे. आता यावर भाजपा काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोदी भक्तांच्या या निष्पापणाला काय म्हणावे? असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करणारा एक शेरही काँग्रेसने या कार्टूनसाठी वापरला आहे.