काँग्रेसची उमेदवारी कायम ; मुक्ताईनगरात रंगणार तिरंगी सामना

0

नगरसेवकपदासाठी 72 तर नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार रिंगणात

मुक्ताईनगर- पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारी कायम ठेवल्याने काँग्रेस-शिवसेना व भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी लढत नगराध्यक्षपदासाठी मुक्ताईनगरला होत असून सतरा प्रभागांमध्ये होणार्‍या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत देखील तिरंगी व काही ठिकाणी चौरंगी लढत दिसून येत आहे. तिरंगी लढतीमुळे निवडणुकीतील चुरस नक्कीच वाढणार आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदासाठी 18 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 72 उमेदवार रींगणात असतील.

प्रभागनिहाय उमेदवारी व रिंगणातील उमेदवार
प्रभाग क्रमांक एकमधून विद्यमान सरपंच ललित शांताराम महाजन यांचे तिकिट भाजपने कापले असून या ठिकाणी भाजपातर्फे कोळी संतोष प्रल्हाद(बबलु) यांना उमेदवारी मिळाली आहे तसेच डमी उमेदवार असलेले काँग्रेसचे धनगर रवींद्र देवीदास यांनादेखील आत्माराम रामचंद्र जाधव यांनी माघारी घेत उमेदवारी दिलेली आहे. या व्यतिरिक्त टोंगे प्रशांत अशोक (शिवसेना), मनीषा दीपक कांडेलकर (अपक्ष), राहुल अशोक पाटील (अपक्ष), दिगंबर सुपडू पाटील (अपक्ष), पंकज सुधाकर कोळी (अपक्ष) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक दोनमधून भारतीय जनता पक्षातर्फे शबाना बी.अब्दुल आरीफ यांना उमेदवारी दिलेली असून शिवसेनेतर्फे खान शगुप्ता बी अफसर व काँग्रेसतर्फे फकीर सलीमा बी.आलम शहा यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे तर स्वाती सुनील माळी या अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक तीनमधून भारतीय जनता पक्षातर्फे वंजारी रत्ना गजानन यांना एकमेव उमेदवारी दिलेली होती तर काँग्रेस पक्षातर्फे पौर्णिमा पवन खुरपडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विजया दीपक नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंदना गणेश तेली, योगीता बाळकृष्ण चव्हाण, पूनम प्रवीण वंजारी, नुसरत बी.मेहबूब खान, सुलभा नीलेश भालेराव या अपक्ष उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक चारमधून काँग्रेस पक्षातर्फे शेख शबाना आरीफ, भाजपातर्फे खान बिल्किस बी.अमानुल्ला, शिवसेनेतर्फे शेख अफरोज बी.शब्बीर तर अपक्ष म्हणून बागवान जमिलाबी मुनाफ, खान शबाना बी रऊफ हे उमेदवार निवडणूक लढत आहेत. प्रभाग क्रमांक पाचमधून काँग्रेस पक्षातर्फे आझाद तस्लीम कैसर मोहम्मद आसीफ, भाजपातर्फे खान शमीम अहमद, शिवसेनेतर्फे शेख हमीदाबी गयास हे निवडणूक लढवत आहेत तर अपक्ष म्हणून खान शबानाबी रऊफ, खान नाझिया बी हनीफ हे उमेदवार निवडणूक लढत आहेत. प्रभाग क्रमांक सहामधून भाजपातर्फे वानखेडे मुकेशचंद्र कैलास, शिवसेनेतर्फे सेनेचे शहराध्यक्ष भालचंद्र प्रशांत प्रभाकर, भारीप बहुजन महासंघातर्फे शिंदे कौस्तुभ साहेबराव हे उमेदवार निवडणूक लढत आहेत. प्रभाग क्रमांक सातमधून भाजपाचे मोरे पियुष भागवत व शिवसेनेच्या मालचे ज्योती त्रिलोक यांच्यात सरळ लढत होत आहे. प्रभाग क्रमांक आठमधून भाजपातर्फे ससाने साधना हरिश्चंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बोदडे उज्ज्वला राजू, भारिप बहुजन महासंघातर्फे बोदडे आशा देवेंद्र हे उमेदवार निवडणूक लढत असून अपक्ष म्हणून बोदडे राजश्री विशाल व गणेश अनिता विशाल हे उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक नऊमधून भाजपातर्फे बागवान बिलकिस बी.शेख, शिवसेनेतर्फे शेख खैरू निशा रऊफ हे उमेदवार निवडणूक लढत असून भोई लक्ष्मीबाई अशोक व शेख रुकैया बानो शेख मजीद या अपक्ष उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक दहामधून भाजपातर्फे खाटीक शेख शकील शेख शकूर, शिवसेनेतर्फे प्रति उमेदवार असलेले शेख इक्बाल गामा तर अपक्ष म्हणून शेख जाकीर शेख जमीर, शेख शकील शेख मुसा, शहा जुबेर शहा निसार हे उमेदवार निवडणूक लढत आहेत. प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपातर्फे शेख मस्तान ईमाम, शिवसेनेचे खान सलीम सईद खान व अपक्ष म्हणून जाफर अली नजीर अली हे निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक बारामधून भाजपातर्फे माजी सभापती माळी राजेंद्र गणपत, शिवसेनेतर्फे पत्रकार मराठे संतोष सुपडू व भारिप बहुजन महासंघातर्फे कांडेलकर संजय प्रल्हाद हे तीन उमेदवार निवडणूक लढत आहेत .
प्रभाग क्रमांक तेरामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे पाटील सरिता रवींद्र भाजपातर्फे पाटील कुंदा अनिल तर अपक्ष म्हणून पुनासे सोनाली योगेश हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 14 मधून बोरखेडे आशा अशोक भाजपातर्फे, शिवसेनेतर्फे भलभले सविता सुभाष तर अपक्ष म्हणून सापधरे शीतल लक्ष्मण असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक पंधरा मधून भाजपातर्फे प्रतीक उमेदवार असलेले शिरसाठ निलेश प्रभाकर यांना उमेदवारी मिळाली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे गवई बळीराम दौलतराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे बोरसे अविनाश समाधान,भारिप बहुजन महासंघातर्फे गवई कुणाल साहेबराव तर अपक्ष म्हणून माजी सरपंच सापधरे रमेश देवचंद हे निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक सोळा मधून भाजपातर्फे माजी सरपंच प्रवीण पाटील यांच्या पत्नी पाटील मनीषा प्रवीण व शिवसेनेतर्फे भारंबे योगिता प्रमोद यांना उमेदवारी मिळाली असून अपक्ष म्हणून महाजन लताबाई प्रभाकर व पाटील रेखा विलास हे उमेदवारी लढत आहेत. प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपातर्फे जैन नितीन मदनलाल, शिवसेनेतर्फे हिवराळे राजेंद्र सुखदेव हे निवडणूक लढत असून राणे रामचंद्र पुरुषोत्तम व सुर्यवंशी दीपक प्रल्हाद हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.