काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. के. जाफर यांचं निधन

0

बेंगळुरू: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर शरीफ यांचे आज दुपारी बेंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. जाफर यांनी १९९१ ते १९९५ या कालावधीत रेल्वेमंत्रिपद भूषवले होते.

जाफर यांना गेल्या शुक्रवारी बेंगळुरूतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी जाफर यांच्या निधनाची माहिती दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाफर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.