पुणे । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे तेरावे वर्ष असून दि. 2 ते 9 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन, काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभ, 125 वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान, विद्यापीठे आणि विद्यमान सरकारची धोरणे, रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यातील योगदानाबद्दल परिसंवाद, दिव्यांग मुलांसोबत आनंदोत्सव, चित्रकला स्पर्धा, सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम, तरुणांसाठी नोकरी मेळावा, जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमात बचत गटातील महिलांचा इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान यांसह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुणे प्रतिनिधी।
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे तेरावे वर्ष असून दि. 2 ते 9 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन, काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभ, 125 वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान, विद्यापीठे आणि विद्यमान सरकारची धोरणे, रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यातील योगदानाबद्दल परिसंवाद, दिव्यांग मुलांसोबत आनंदोत्सव, चित्रकला स्पर्धा, सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम, तरुणांसाठी नोकरी मेळावा, जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमात बचत गटातील महिलांचा इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान यांसह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस कनेक्ट अभियान पुण्यातून
काँग्रेसने 60 वर्षांच्या काळात देश उभारणी केली. राजीव गांधी यांच्या काळात संगणकीय युगाची पायाभरणी झाली. काँग्रेसने काहीही केले नाही, असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे या काँग्रेसी योजनांचा लाभ घेऊन पुढे आलेली युवा पिढी आणि दूर गेलेला सुशिक्षीत वर्ग या अपप्रचाराला बळी पडला. त्यांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याकरीता ‘काँग्रेस कनेक्ट’ हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ पुण्यामध्ये होणार आहे.
युवा पिढीला, सुशिक्षीत मध्यमवर्गीयांना काँग्रेसने देश उभारणीत दिलेल्या कार्याची माहिती देणे, काँग्रेसविषयीचे गैरसमज दूर करणे, त्यांच्याशी संपर्कात राहून काँग्रेसविषयी माहिती देणे आदी उपक्रम राबविणार आहेत.