जळगाव : देशात आणि राज्यात दररोज पेट्रोल, डीजेलचे दर वाढवले जात आहेत. आजचे पेट्रोल व डीझेलचे दर हे आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त दर आहे. सातत्याने पेट्रोल, डीजेलच्या दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष असून जनतेची मोठ्या प्रमाणात राज्य व केंद्र सरकारकडून लुट सुरु आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे (कच्चा तेलाचे) दर तुलनात्मक रित्या घसरले असतांना हे सरकार त्याचा प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेला न देता तेल कंपन्यांचा नफा वाढवून,अतिरिक्त सरकारी कर लादुन तेल कंपन्या व सरकारी तिजोरी भरण्याचे काम करीत आहे. याचा काँग्रेस पक्षा तर्फे निषेध करण्यात आला. याआंदोलन जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.ए.जी.भंगाळे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी याच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आले.
दुष्काळाच्या नावाखाली सरकारकडून लुट
इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील आठ दिवसांपासून पेट्रोल आणि डीजेलच्या किमती रोज वाढवल्या जात आहे. आज रोजी जळगाव शहरात पेट्रोलचे दर प्रती लिटर 86 रु.22 पैसे तर डीझेल 72 रुंपये, 76 पैसे इतके आहे. केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे देखील इंधनावर विविध प्रकारचे सरचार्ज लावले जात आहेत. पेट्रोल, डीझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लादुन लुट सुरु आहे. सरकारने पेट्रोल, डीझेलला जीएसटी (ॠडढ) अंतर्भूत करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जळगाव शहर जिल्हा काँग्रेसतर्फे काँग्रेस पक्षाने केली आहे. जोपर्यंत पेट्रोल व डीझेल यांची दरवाढ मागे घेवून, रोखून हे सरकार जनतेला दिलासा देत नाही तोपर्यंत सामान्य जनतेच्या भावनांसाठी व प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरतच राहील.