जळगाव । मोदी सरकारला तीन वर्ष पुर्ण झाले. तरीदेखिल देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ न आल्याने जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने नुसत्या घोषणा व पोकळ आश्वासने दिली. या आश्वासनांचे बुडबुडे हवेतच विरले. नोटबंदीचा फटका शेतकर्यांना बसला आहे.
शेतमाला आधारभाव नाही
शेतमालाला आधारभाव नाही. ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्मिती नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून जात आहे. मार्केटिंगतंत्र अवलंबविल्याने नुकास होत आहे. मोदी सरकारने सामान्य जनतेच्या महागाईविषयी तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोदी सरकारचा निषेध देखील निवेदनात करण्यात आलेला आहे. मोदी सरकार सर्वंच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदनावर महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अॅड. संदीप पाटील यांच्या सह्या आहेत. याप्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, दिलीप पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, शरद महाजन, मालोजीराव पाटील, रतिलाल चौधरी, अॅड. अविनाश भालेराव, चंद्रशेखर पाटील, श्रीधर चौधरी, अनिल पाटील, उल्हास साबळे, भगवानदास पुरोहीत, पिरनकुमार महाजन आदी उपस्थित होते.