रायपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत 40 नेत्यांचा समावेश असून स्टार प्रचारकांमध्ये कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पीसीसी अध्यक्ष भूपेश बगेल, चरणदास महंत, टीएस सिंहदेव, छाया वर्मा, अरविंद नेताम यांचा समावेश आहे.
या जाहीर केलेल्या यादीत राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मोती लाल वोरा, सुशील कुमार शिंदे, अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, पीएल पुनिया, मुकुल वासनिक, ताम्रध्वज साहू, ज्योतिरादित्य सिंधिया , कॅप्टन अमरिंदर सिंह, राज बब्बर, प्रमोद तिवारी, अशोक चव्हाण, रणदीप सुरजेवाला, नवजोत सिंह सिद्धू, शक्ति सिंह गोहिल, कुमारी शैलजा, आशा कुमारी, प्रदीप जैन आदित्य, श्री प्रकाश जयस्वाल, डॉ. अखिलेश प्रताप सिंह, मोहम्मद अझरुद्दीन, भूपेश बघेल, टीएस सिंहदेव, चरण दास महंत, चरण यादव, अरुण उरांव, हरनाम सिंह, भक्तचरन दास, सुष्मिता देव, शर्मिष्टा मुखर्जी, रागिनी नायक, नितिन राऊत , नदीम जावेद, अरविंद नेताम, शिव दहारीया आणि छाया वर्मा यांची नावे आहेत.