जळगाव। काँग्रेसला मुस्लीम समाज 70 वर्षे समर्पीत राहिल्याने विकासापासून वंचीत राहील्याचा आरोप भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी माजी राष्ट्रीय सरचिटणीस अल्प संख्यांक मोर्चा शे.अ.करीम , प्रदेश सरचिटणीस हाजी एजाज देशमुख, प्रदेश सचिव वैभव काला, माजी प्रदेश सदस्य अॅड.शहबाज शेख, डॉ. नजरूल इस्माईल, शब्बीर अली, इरफान नुरी
उपस्थित होते.
बुथच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार
जमाल सिद्दीकी यांनी यावेळी सांगितले की, पंडीत दिनदयाल जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपा विशेष उपक्रम राबवित आहे. याअंतर्गत भाजपाचे कार्यकर्ते प्रत्येक बुथच्या माध्यमातुन घरोघरी शासनाच्या योजना पोहचविणार आहेत. भाजपाचे 73 हजार 300 बुथ आहेत. त्यात 3 हजार 500 बुथ अल्पसंख्याकांचे आहेत. बुथच्या माध्यमातुन संघटना मजबुत केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी भाजपाची रचना समजवत भाजपातील बुथचे महत्व स्पष्ट केले. यापुढे ज्याठिकाणी अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात आहे तेथे बुथ उभारले जाणार असल्याचे सांगितले. बुथचे महत्व पटवून देतांना त्यांनी मुख्यमंत्री आजदेखील नागपूर गोकूल पेठेतील बुथचे अध्यक्ष असल्याचे सांगितले.
भगव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न
गोहत्या संदर्भात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देतांना नागपूर येथे सलीमवर हमला करणारे स्वत:ला बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगत होते. मारहाण करणारे अपक्ष आ.बच्चु कडुचे लोक होते. 70 वर्षे मुस्लीम समाजाला बदनाम केले गेले. आता हिंदू समाजाला बदनाम करण्यात येत आहे. यासाठी सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे. इस्लाम मध्ये हिंसा नसतांना काहींनी इस्लामला आंतकी घोषीत केले. आता भगव्याला बदनाम केले जात आहे. बच्चु कडु खुर्चीसाठी जातीय विभाजनाचा प्रयत्न करत आहे. त्यांनी आधी शेतकर्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला. त्या यश आले नाही म्हणून हिंदूना बदनाम करण्यासाठी व मुस्लीमांमध्ये अशांतता पसरविण्यासाठी सलिमवर हल्ला केला. अशा प्रवृत्तीवर कारवाई करण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
नाथाभाऊ, आमीरसाहेब आमचे नेते
आमीर साहेब हुसेन यांच्या बद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना. भाजपात कार्यकर्ते हे सेवेसाठी काम करतात. कोणता कार्यकर्ता कोठे काम करू शकतो किंवा त्याचा अधिक चांगला उपयोग कोठे होवू शकतो याचा निर्णय वरिष्ठ घेतात. आमिर साहेबांचे पद काढण्यात आले असले तरी संघटना त्यांना दुसरी जबाबदारी देण्याचा विचार करत असावे. नाथाभाऊ आणि आमीरसाहेब हे सुध्दा आमचे नेते आहेत असे त्यांनी सांगीतले.