जयपूर- सध्या देशभरात करतारपूर गुरुद्वाराच्या मुद्दा गाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी याच मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. फाळणीच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजुतदारपणा, संवेदनशिलता आणि गांभीर्य दाखवले असते तर करतारपूर भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानमध्ये गेले नसते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
राजस्थानमधील हनुमानगड येथे मोदींनी प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मोदी यांनी करतारपूर गुरुद्वावारवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांना प्रथमच उत्तर दिले. भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे करतारपूर कॉरिडोरवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकीकडी पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतल्याने भाजपाकडून सिद्धूवर टीका होत आहे. तर सिद्धू यांनी थेट मोदींनाच टीकेचे लक्ष्य केले आहे.