काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

0

मुक्ताईनगर- तालुका काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या व युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने मुक्ताईनगर जिल्हा उपरुग्णालयात सर्व रुग्णांना फळवाटप माजी खासदार उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान, अ‍ॅड.गोसावी, बाळू कांडेलकर, अतुल जावरे, फिरोज खान टेलर, हिरसिंग चव्हाण, अनिल सोनवणे, राजू जाधव, संतोष कोळी, नरेंद्र मराठे, अमोल जैन उपस्थित होते

अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
वाढदिवसाचे औचित्य साधून मुक्ताईनगराचे शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे यांच्या प्रयत्नाने मुक्ताईनगर शहरातील असंख्य तरुणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी खासदा उल्हास पाटील, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान यांनी स्वागत केले. प्रसंगी नईम खान रऊफ खान, वहाब खान इसाक खान, शेख रहिम शेख जब्बार, रईस शेख रशीद काजी, आतीक काजी, शे.अरमान शे.महेबूब, तौसीक काजी बशीर काजी, साबीर खान मुबारक खान, शे.साबीर शे सब्दर, शे.इस्माईल शे.रासुद, शे जुनेद शे रऊफ शेख वसीम यांच्यासह असंख्य समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.