जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांची माहिती
भुसावळ : राष्ट्रीय काँग्रेस अनु.जाती विभागाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, व जळगांव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना या संसर्गाशी लढा देणार्या भुसावळ शहरातील कोरोना योद्धयांचा गौरव शुक्रवार, 19 रोजी काँग्रेस अनु.जाती विभाग करणार असल्याचे काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी कळविले आहे.