काँग्रेस कमेटीच्या जनसंवाद यात्रेस न्हावी गावात व नागरीकांचा मोठा प्रतिसाद

न्हावी प्रतिनिधी दि 11

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संपुर्ण राज्यभरात काढण्यात येत असलेल्या जनसंवाद पदयात्रेस न्हावी गावातुन ,या यात्रेस युवकांचा मोठा प्रतिसाद मिळतांना . दिसला काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या जनसंवाद यात्रा दरम्यान रावेर यावलचे आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतांना राज्यातील व केन्दातील सरकारच्या कार्यकाळात महागाईमुळे सर्वसामान्यांचे होत असलेले हाल, देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था आणी शेतकऱ्यांच्या समस्या, करोडो शिक्षीतांची वाढती बेरोजगारी यासह सर्व पातळीवर केन्द्र आणी राज्य शासनाच्या अपयशाचे खरपुस समाचार घेतले ,यावेळी काँग्रेस कमेटीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील,निरीक्षक मुन्नवर खान , प्रदेश सरचिटणीस जलील पटेल, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हमीद काझी, महाराष्ट्र एमएसयुआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी,यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील,शहराध्यक्ष कदीर खान, तालुका खरेदी विक्री शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड,तुळशीराम तायडे,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी,माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील,आशुतोष पवार, हाजी शब्बीर खान पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी,सुनिल फिरके, वसंत महाजन,सुनिल वा्घुळदे, लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच सौ हेमांगी झोपे, आरती तडवी, गाजरे, , ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे गफ्फार, शेख नदीम, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले