नवी दिल्ली : नऊ वर्षांपासून कोमात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 72 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी दीपा दासमुन्शी आणि मुलगा प्रियदीप आहेत.
2004 मध्ये बंगालच्या रायगंज मतदारसंघातून लोकसभेत ते अखेरचे निवडून गेले होते. ते यूपीए 1 सरकारमध्ये ते मंत्री होते. 2008 मध्ये त्यांना स्ट्रोक आणि पॅरालिसिस झाला. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दासमुन्शी प. बंगालमधून काँग्रेसचे लोकसभा खासदार होते. पॅरालिसिसनंतर त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा बंद झाला होता. शरीराच्या इतर भागाला जास्त नुकसान झाले नव्हते. तथापि, मेंदूच शरीराच्या सर्व अवयवांचे नियंत्रण करतो, यामुळे दासमुन्शी 9 वर्षे बेडवरच होते.