काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तीर्थक्षेत्रास भेट द्यावी

0

संदेश नवले यांनी दिले निवेदन

पिंपरी : काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, जोतीराज शिंदे, राजीव सातव, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण आदींनी देहू-आळंदी येथील तीर्थक्षेत्रास भेट द्यावी, अशा मागणीचे निवेदन चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे ÷ब्लॉक अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी काँग्रेस पक्षाचे युवा राष्ट्रीय नेते राजीव सातव यांच्याकडे दिले. दिल्लीतील नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या सर्व नेत्यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी संत तुकाराम महाराजांची गाथा व संत ज्ञानेश्‍वरांचा ज्ञानेश्‍वरी ग्रंथ भेट देण्यात आले.

या निवेदनात नवले म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आळंदी-देहू तसेच देहूरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीला तसेच शिवनेरीला भेट दिली पाहिजे. राज्यातील सर्व गावागावात संदेश जाईल. गावागावांमध्ये नागरिकांना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल. पक्षाला नवी चेतना मिळू शकेल.