काँग्रेस वर्धापनदिनानिमित्त पुण्यात ध्वजवंदन

0

पुणे : काँग्रेस पक्षाच्या १३३व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे शुक्रवारी सकाळी पक्षप्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

काँग्रेस स्थापनेमध्ये ज्या थोर व्यक्तींनी सहभाग घेतला त्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा सहभाग मोठा होता. इंडियन नँशनल काँग्रेस हे नांव न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी दिले असे डॉ. महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक वसंतराव जोशी, आ.अनंत गाडगीळ, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे, माजी महापौर दीप्ती चवधरी, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, अनिल सोंडकर, संगीता तिवारी, श्रीरंग चव्हाण, सचिन आडेकर, चैतन्य पुरंदरे आदी उपस्थित होते.